Wednesday, March 9, 2011

कवि सम्मेलन,मुसशायरा सम्पन्न,,,

आग नफरत की बुझावो तो कोई बात बने...
वकिलाच्या कार्यालयात रंगली मराठी, हिंदी, उर्दू काव्यमैफल
कल्याण, दि. ९ (प्रतिनिधी) - वकिलाचे कार्यालय म्हटले म्हणजे अशील, आरोपी, साक्षीदार यांचा सतत वावर असतो. खटला कसा चालवायचा, पुरावे कसे सादर करायचे याचीच ‘कोर्ट छाप’ चर्चा सुरू असते. पण कल्याणमधील एक प्रसिद्ध वकील मसूद पेशइमाम यांच्या कार्यालयात चक्क मराठी, हिंदी, उर्दू कविसंमेलन आयोजित केले होते. ठाणे जिल्ह्यातील अनेक नामवंत व नवोदित शायरांनी त्यात सहभाग घेतला. वा... क्या बात है... मुर्कर्ररऽऽ... अशा उत्स्फूर्त शब्दांनी हे कार्यालय काव्यमय झाले.
मसूद पेशइमाम हे व्यवसायाने वकील असूनही त्यांना उर्दू व इंग्रजी कवितांची प्रचंड आवड आहे. त्यांनी स्वत: यावेळी काही उर्दू कवितांचा इंग्रजी अनुवाद सादर केला. अख्तर जमाल, बारी अलाहाबादी, वसीम अलमास, तन्वीर रायबेरी, गनी अश्रफ या शायरांनी सामाजिक, राजकीय तसेच देशभक्तिपर भावनांच्या अंतर्मुख करणार्‍या गझला पेश करून रसिकांची मने जिंकली.
कविसंमेलनाचे अध्यक्ष -डॉ.आर.एल.राव "राज बुंदेली" यांच्या कवितांनी वन्समोअर मिळवला. आपल्या जोशपूर्ण शैलीत ते म्हणाले,
आग नफरत की बुझाओ,तो कोई बात बने !
दिलों को दिल से मिलाओ,तो कोई बात बने !!

रोशनी या स्वत: डॉक्टर व वकील। त्यांनीही या मैफलीत ‘वो मेरी तिश्‍नगी का मर्तबा घटने नही देता’ असे म्हणत सर्वांची वाहव्वा मिळवली। प्रसिद्ध उर्दू शायर अफसर दकनी यांनी प्रेमाचे ढोंग रचणार्‍या प्रेयसीवर आपल्या गझलेतून कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले,
तुमने सचमुच प्यार किया है
या फिर प्यार का ढोंग रचा
हमने तो सपने भी खोए
अब क्या खोना बाकी है...
बाळासाहेब तिरणकर, संदीप राऊत यांनीही आपल्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. परिवहन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल इरफान शेख, साद खोत, आरीफ पठाण यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक इफ्तकार आयुब खान, सामाजिक कार्यकर्ते आजम दकनी यांच्यासह अनेक काव्यप्रेमी या मैफलीस उपस्थित होते.आपली प्रतिक्रिया कळवा
No comments: